Pune News : सेट परिक्षाविषयक कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने राज्यस्तरीय पात्रता परिक्षार्थींसाठी आयोजित कार्यशाळेला पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंका व प्रश्नांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी केले. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले. या वेळी सेट विभागाचे समन्वयक प्रा. बी. पी. कापडणीस व सहायक कुलसचिव श्रीकांत बुरकुले उपस्थित होते.

या वर्षीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परिक्षेआधी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान होण्याच्या दृष्टिकोनातून तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रा. कापडणीस यांनी सेट परीक्षेत 2017 नंतर झालेल्या बदलांबाबत माहिती दिली. प्रा.डॉ. एच. एन. जगताप यांनी अध्यापन योग्यता या विषयावर, प्रा. डॉ. एम. उपालने यांनी संशोधन योग्यता, प्रा. डॉ. बी. एन. वाफारे यांनी गणितीय तर्क व अध्यापन यावर तर डॉ. के. बी. पाटील यांनी संवाद या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत 5 ऑगस्ट रोजी 10.30 ते 12 या वेळेत विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

लिंक – https://www.facebook.com/ecdlic

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.