Talegaon News : थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेत महिला शिक्षण दिन साजरा

एमपीसी न्यूज : तळेगांव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांनी आघाडी सरकारने घेतलेल्या शिक्षण दिन या निर्णयाचे स्वागत करत नगरपरिषदेच्या थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेत  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 190वी जयंती निमित्ताने महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला.  

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीच्या हस्ते दीपप्रज्वनाने झाली. यानंतर सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित एक चित्रफीत सर्वांना दाखवण्यात आली.

तळेगांव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष वैशाली  दाभाडे यांनी नगरपरिषदेच्या शाळा क्र 2,3,4,6 राज्यस्तरीय शिष्यवृत्ती प्राप्त 3 विध्यार्थीनी, N.M.M.S. परीक्षेत यशस्वी विद्यार्थी तसेच इयत्ता दहावी मधील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विध्यार्थीनी व तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा गुलाब रोप देऊन व विद्यार्थीनीना  शैक्षणिक साहित्य देऊन  सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले. प्रास्ताविक वर्षा थोरात यांनी केले.तसेच मंगलताई भेगडे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षामुळे मी आज उपनगराध्यक्षा या पदावर निर्भीडपणे काम करण्याची संधी मिळाली असे मत त्यांनी व्यक्त केले. चूल व मूल ही संकल्पना मोडीस काढून स्त्री शिक्षणाचे धडे देणाऱ्या महिला मुक्तीच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन शिक्षण दिन म्हणून राज्य सरकारने घोषित  केला. याबद्दल राज्य सरकारच्या स्तुत्य निर्णयाचे स्वागत करून आभार मानले.

आभार प्रदर्शन तळेगाव शहर उपाध्यक्ष ज्योती शिंदे यांनी केले .याप्रसंगी रुपाली दाभाडे (शहर कार्याध्यक्ष ) नीशा पवार ( तालुका युवती अध्यक्ष), शिवानी सोनवणे शहर युवती अध्यक्ष या उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगिता शिंदे, शीतल रासकर, सुधीर बसवंते, सुप्रिया वाव्हाल, शंकर तोळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.