Chikhali News : माजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत हरित अभिष्टचिंतन सप्ताह

एमपीसी न्यूज –  माजी महापौर नगरसेवक राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक दोन चिखलीमध्ये हरित सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल जाधव स्पोर्टस फौंडेशनच्या माध्यमातून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल जाधव यांचा वाढदिवस प्रभागातील सर्व डीपी रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करून तसेच प्रभागातील नागरिकांना वृक्ष रोपे वाटून साजरा करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

चिखली भागातील अंतर्गत रस्ते तसेच नवीन डीपी रस्ते मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. सर्व विकिसीत रस्त्यांचे शुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी विकसित रस्त्यांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच, अंतर्गत नवीन सिमेंट रस्त्यांचे शुशोभीकरण करण्यासाठी विविध फुलांची रोपे, वेल प्रवर्गातील रोपे नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. यावेळी जवळपास 3,000 रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

राहुल जाधव यांनी प्रभागातील नागरिकांना मित्रपरिवार व हितचिंतकांना वाढदिवसानिमित्त गर्दी नकरण्याचे आव्हान केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.