Dighi: बोपखल फाटा ते दिघी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळ – नगरसेवक डोळस

रस्ते विकासाच्या जागा भूसंपादनाच्या खर्चास स्थायीची मंजूरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतल बोपखल फाटा ते दिघी जकात नाका या दोन किलोमीटरच्या रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या रुंदीकरणासाठी खासगी वाटाघाटी करुन, भूसंपादनासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीने आज (मंगळवारी)मान्यता दिली आहे. यासाठी स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

बोपखेल ते दिघी हा दोन किलोमीटरचा महामार्ग लष्करी हद्द तसेच वीएसएनएल आणि टाटा कम्युनिकेशन या आस्थापनांजवळून जात असल्याने अद्यापही या जागेचे संपादन झालेले नाही. त्यामुळे यादरम्यान वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी व्हीएसएनएल आणि टाटा कम्युनिकेशन या दोन आस्थापनांशी चर्चा करून जागा महापालिकेला देण्याबाबत स्थानिक नगरसेवक विकास डोळस हे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होतो. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. खासगी वाटाघाटीतून रस्त्यासाठी भुसंपादन करण्यास येणा-या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामध्ये सर्वेक्षण, मोजणी करणे, मुल्यांकन, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, वकील फी इत्यादी खर्चाचा समावेश असणार आहे.

पत्रकारांशी बोलताना नगरसेवक विकास डोळस म्हणाले, अरुंद रस्ता असल्याने बोपखेल फाटा ते दिघी जकात दरम्यान वाहतुक कोंडी होत होती. त्यामुळे 60 मीटर रस्ता करणे आवश्यक होते. परंतु, रस्त्याच्या जागा महापालिकेच्या ताब्यात नव्हती. त्यामुळे मोठा अडथळा येत होता. व्हीएसएनएल आणि टाटा कम्युनिकेशन यांच्या ताब्यात ही जागा होती. खासगी वाटाघाटी करुन जागेचे भुसंपादन करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मी पाठपुरावा करत होता. जागेचे भूसंपादन करण्यासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीने आज मंजुरी दिली. त्यामुळे आपल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता जागेचे भुसंपादन करुन रस्त्याचे काम वेगात पुर्ण करुन घेतले जाईल. रस्त्याचे काम झाल्यानंतर वाहतुक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

नगररचना विभागातील तत्कालीन अधिका-यांची बदली केली. त्यांच्या जागी नवीन अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन अधिका-यांनी भूसंपदनाबाबत वेगात कार्यवाही केली. भाकरी फिरविली की कामे होतात. एका अधिका-याला एकाच ठिकाणी ठेवली की जनतेची कामे होत नाहीत. त्यामुळे भाकरी फिरविणे गरजेचे आहे. फिरविल्यास चांगली राहते. करपत नाही. त्यामुळे विविध विभागातील भाकरी फिरवा. म्हणजे करपणार नाही, असा सल्लाही डोळस यांनी आयुक्तांना दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.