Pimpri News : हुतात्मा बाबू गेनू यांना पालिकेकडून अभिवादन

एमपीसी न्यूज – हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी बाबू गेनू यांनी भारतीय स्वतंत्र लढ्यातील स्वदेशी आंदोलनात आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाजविकास अधिकारी संभाजी येवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

हुतात्मा बाबू गेनू मुंबई मधील एका स्वदेशी आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यात एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्या अंगावरून ट्रक चालवून त्यांची हत्या केली. अवघ्या 22 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 22 वर्षाच्या जीवनप्रवासात त्यांनी दोन वेळा स्वातंत्र्यलढ्यासाठी कारागृहाची शिक्षा भोगली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.