Morwadi News : पुण्यश्लोक प्रतिष्ठान तर्फे अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पुण्यश्लोक प्रतिष्ठान तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडीतील त्यांच्या पुतळ्यास अध्यक्ष विलास महानवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे सागर कोपनर, भाऊ उघडे, नरसिंग माने, बापू धोंडे,सागर तरंगे, सागर पालवे, अनिल सरक, अशोक उकले, शंकर साळुंखे आदी उपस्थित होते.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास महानवर म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे असंख्य पैलू आहेत. जगभरातील स्त्रियांसाठी त्या अक्षय प्रेरणास्रोत आहेत. लोककल्याणकारी राज्य कसे चालवावे याचा आदर्श वस्तुपाठ आहेत. अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नसून समाजकेंद्री होते. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देश जोडण्याचे कार्य करणाऱ्या त्या दृष्ट्या राष्ट्रमाता आहेत’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.