Pimpri : महापालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी चौकातील त्यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Pimpri : अहिल्याबाईंनी औद्योगिक धोरणातून रोजगार निर्मिती केली – काशिनाथ नखाते

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजू दुर्गे, माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विजय भोजने, बापू गायकवाड, उप अभियंता बाळासाहेब शेटे, संध्या वाघ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, उमेश बांदल,नितीन समगीर, चारुशीला जोशी,सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने,संजय कवितके,रोहिदास पोटे, संजय शेंडगे, अच्युत लेंगरे , संजय नाईकवडे, दिलीप कवितके, विठ्ठल कवितके, जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, श्रेयश जाधव, मनपा कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सांगवी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी महापौर उषा ढोरे, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, हर्शल ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनावणे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.तृप्ती सागळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अजय बिरू दुधभाते, सुर्यकांत गोफणे, जवाहर ढोरे,हिरेन सोनावणे,अभिमन्यू गाडेकर, मनोजकुमार मारकड, सुधाकर सूर्यवंशी, मारुती भोलेकर, नवनाथ भिडे, विलास पाटील, विजयकुमार हारनोळ, नारायण भुरे, गोरेकाका, बळीराम घोडके, ज्ञानेश्वर भगत, कृष्णराव गिरगुणे, मेजर संभाजी गोफणे, माणिकराव देवकाते, विनायक पिंगळे, टेकाळेकाका आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.