Karla : अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा

एमपीसी न्यूज –  ज्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात पत्रकारीतेपासून केली. आपल्या अखंड मेहनतीच्या जोरावर देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत ज्यांनी झेप घेतली व आपल्या अभ्यासुवृत्तीने कवीत्वाची, साहित्याची साधना सांभाळत ज्यांच्या वाणीमुळे जनसामान्यवर भूरळ पडत असे देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्ला येथे पञकार, परिसरातील नागरिक व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी कार्ला पंचक्रोशीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक रघुनाथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या शोकसभेत पञकार भाऊसाहेब हुलावळे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्र बोञे, देवघरचे पोलीस पाटील अनंतामहाराज शिंदे, वेहेरगाव दहीवलीचे उपसरपंच सचिन येवले, मावळ तालुका भाजपा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष समीर हुलावळे यांनी शोकसभेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष तानाजी भानुसघरे, वाकसई गण राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष गायकवाड, मावळ विधानसभा युवासेना चिटणीस विशाल हुलावळे, भाजपा युवा मोर्चा मावळ तालुका उपाध्यक्ष अमोल भेगडे, सागर येवले, मल्हारी हुलावळे सह अनेक ग्रामस्थ होते. पञकारांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.