Rahatani : न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

त्यानिमित्त “वाचन प्रेरणा दिवस” करण्यात आला. प्रमुख मान्यवर संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाबिश, आनंद शिंदे, तात्या शिनगारे (सामाजिक कार्यकर्ते), सुमित आखाडे, राजकुमार खोत आदी उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या दर्शनी भागात वाचन प्रेरणा दिनाचे भित्तीपत्रक लावण्यात येऊन मुलांना वाचन कट्टा, पुस्तकपेढी, पुस्तकवाचन संकल्प, पुस्तकाचे प्रदर्शन या संदर्भात मान्यवरांनी मागर्दर्शन केले. वाचन स्पर्धा व विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी मुलांना जेवण्याच्या आधी व काहीही गोष्टी खाण्या अगोदर स्वच्छ  हात धुणे , शोचाल्याला गेल्या नंतर, खोकला जोरात आल्या नंतर साबणाने  स्वच्छ हात धुणे बाबत मागर्दर्शन करण्यात आले. यामुळे डायरिया व कावीळ  या सारखे आजार न होण्याबाबत माहिती देण्यात आली, वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, संविधानातील प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा शेलार  आणि  आभार प्रियांका लाडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.