Pimpri news : महापालिकेतर्फे लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ‘ब’ प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.