Pimpri : पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे दिवंगत शंकर गावडे यांना अभिवादन 

एमपीसी   न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे दिवंगत अध्यक्ष शंकर (आण्णा) गावडे यांच्या १४ व्या पुण्यस्मरणदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 

मनपा मुख्य कार्यालय, मनपातील विविध विभाग, पीएमपीएमएलचे पिंपरी-चिंचवडमधील आगारांमध्ये तसेच वाय.सी.एम हॉस्पिटल येथे विविध उपक्रमांनी अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता (काका) साने, सभापती स्थायी समिती ममता गायकवाड, नगरसेविका अनुराधा गोरखे,  नगरसेवक शितल शिंदे, नामदेव ढाके, सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेचे अध्यक्ष आबा गोरे त्याचप्रमाणे कर्मचारी महासंघाचे चारुशिला जोशी, अतुल आचार्य, महाद्रंग वाघेरे, मुकुंद वाखारे, शिवाजी येळवंडे, भगवान मोरे, अनिल लखन, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, पांडुरंग मस्के, संजय कापसे, सिमा सुकाळे, दिलीप गुंजाळ, सुनिल विटकर, विशाल भुजबळ, महादेव बोत्रे, राणु ठोकळ, नंदकुमार घुले, हनुमंत चाकणकर, बालाजी अय्यंगार, दीपक गळीतकर, राजाराम चिंचवडे, उत्तम गंगावणे, नथा मातेरे आदी पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, व मनपातील इतर अधिकारी – कर्मचारी तसेच स्व. शंकर (आण्णा) गावडे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

पुण्यस्मरण दिनानिमित्त औचित्य साधून वाय.सी.एम. हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी जेवण व औषधे उपलब्ध करुन देणाऱ्या “रियल लाईफ, रियल पिपल” संस्थेचे अध्यक्ष  एम. ए. हुसैन यांना कर्मचारी महासंघातर्फे रुपये ५०,०००/- चा धनादेश सुपूर्त करण्यात आला. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघामार्फत वाय.सी.एम. हॉस्पिटलमध्ये ना नफा ना तोटा तत्वावर चालविण्यात येणाऱ्या महासंघ मेडिकल्सच्या सर्व आर्थिक बाबींचा विचार करुन यापूर्वी कर्मचारी व नागरिकांना देण्यात येणाऱ्या औषधांच्या सवलतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय अध्यक्ष, कर्मचारी महासंघ यांनी जाहीर केला.

सद्यस्थितीत मनपा कर्मचाऱ्यांना 10 टक्के, तसेच इतर नागरिकांसाठी 5 टक्के, सवलत देण्यात येते. तथापी यापुढे मनपा कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना औषध खरेदीवर 15 टक्के, तसेच इतर नागरिकांना10 टक्के, जेनेरीक औषधांवर 30 ते 70 टक्के, व सर्जिकल साहित्यांवर 20 ते 40 टक्के सवलत देणे असे या निर्णयाचे स्वरुप असणार आहे. यावेळी ज्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना दिर्घकाळासाठी औषधे घ्यावी लागतात अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार औषधे दरमहा ठरवून दिलेल्या दिवशी त्यांच्या कार्यालयात पोहोच करण्याची योजना या निमित्ताने सुरु करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तद्नंतर वाय.सी.एम. रुग्णालयातील विविध वॉर्डांमधील रुग्णांना फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत लांडगे यांनी केले व आभारप्रदर्शन मनोज माछरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.