Pimpri : महात्मा गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे  महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अजमेरा येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे, युवकाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अशोक काळभोर, नाशिक महापालिका अभियंता मुरलीधर माधव, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवृत्त आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, श्री दत्त मंदिर ट्रस्टच्या संस्थापक विस्वस्त दिलीप पालेकर, चैताली दास, मिताली चक्रबोर्ती, जयश्री कननाइके उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.