Pimpri : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

एमपीसी न्यूज –   महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागरमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नवचैतन्य हास्यक्लब, लायन्स क्लब आणि नगरसेविका निर्मला कुटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन पिंपळे सौदागर येथील लिनीअर अर्बन गार्डन येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे,हास्यक्लब व लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी परिसरातील स्वच्छता केली.

असंघटीत कामगार कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहराच्यावतीने येथील जय गणेश वरदहस्त कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. शहर अध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. मनोहर वाघमारे, नवनाथ डेंगळे, रमजान आत्तार,बबन शिरसाठ, शितल कोतवाल, संगिता गाडे, कौशल्या भोसले, गणेश जंजीरे यावेळी उपस्थित होते.

वाकड. गणेशनगर, थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुल मध्ये गांधी जयंती व लाल बहाद्दुर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी (ECA) पर्यावरण संवर्धन समितीचे सदस्य सुभाष चव्हाण, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह सतिश गोरडे, पिंपरी चिंचवड म.न पा.च्या आरोग्य विभागाचे अधिकारी सुभाष  -चन्नाळ व त्यांचे सहकारी, खिंवसरा पाटील विद्यामंदिरचे मुख्याध्यापक नटराज जगताप,लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बालवाडी विभाग प्रमुख आशा हुले आदी उपस्थित होते.

सतिश गोरडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वछता अभियानाचे महत्त्व सांगितले. यात आपण सहभागी होतो का? याचे आत्मचिंतन करा. अस्वच्छतेमुळे रोगराई होते म्हणून स्वच्छतेची सुरुवात स्वतः पासून  करा.  घर, घराबाहेरील परिसर, रस्त्यावरील कचरा मी उचलून कचराकुंडीत टाकणार अशी आपण प्रतिज्ञा करू असे सांगितले. सुभाष चव्हाण यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड म.न.पा.चे आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या उपस्थितीत ठिक ठिकाणी स्वच्छता मोहीम काढण्यात आली. स्वच्छतेसाठी  सर्वांनी वर्षातून 100 तास म्हणजेच आठवड्यातून दोन तास दिले पाहिजे. असे सांगितले तसेच खिंवसरा पाटील शिक्षण संकुल या शाळेत ज्ञानदाना बरोबर सामाजिक ज्ञान ही दिले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन नक्कीच उज्वल होणार आहे ही शाळा उपक्रमशील शाळा आहे व शाळेतील सर्व शिक्षक आदर्श आहेत असे सांगून शाळेचे खूप कौतुक केले.  पर्यावरण संवर्धन समितीतर्फे पूर्ण पिंपरी चिंचवड परिसरात 28 सप्टेंबर ते दोन आक्टोबर या पाच दिवसात स्वच्छता मोहीम काढण्यात आली. आमच्या शाळेने ही यात सहभाग घेतला. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांनी गणेशनगर परिसरात स्वच्छता केली. तसेच स्वच्छता मोहीम या विषयावर विद्यार्थ्यांच्या चित्रकला व निबंध स्पर्धा घेतल्या. स्वच्छतेची शपथ घेतली. सायली पारधे, प्राजक्ता गजधने, कांबळे सोहम, नेहा सातारकर, सोनाली कदम, वैष्णवी जगताप या विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी तसेच हिंदी या भाषेत महात्मा गांधीजी व लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या विषयी मनोगते व्यक्त केली.

आशा हुले यांनी रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम हे भजन अतिशय सुरेल आवाजात म्हंटले. पुनम औताडे व त्रिवेणी खामकर या शिक्षिकांनी गोष्टीरूपाने महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या विषयी माहिती सांगितली. लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी नावातच नाही तर कर्तृत्वात होते बहाद्दुर असे सांगून महात्मा गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांच्या कार्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली. योगिनी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व खिंवसरा पाटील विद्यामंदिर चे मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी परिसर स्वच्छतेबरोबर मनाची सुद्धा स्वच्छता करा. मनातील जळमटे काढून टाका. असे सांगून सर्व उपस्थितांचे आभार मानले.

पिंपरी चिंचवड अंतर्गत स्वच्छ भारत  अभियान राबविले  निगडी प्राधिकरणात दुचाकी ची रॅली काढण्यात काढण्यात  आली अकरा दुचाकी वरून हातात बोर्ड घेवून रॅली काढली व  8 ठिकाणी मोठे बोर्ड लावले रॅलीचे विसर्जन अ – प्रभागात करण्यात आले. तेंव्हा अ – प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे व शिक्षण उपसभापती शर्मिला बाबर यांनी भारतीय स्त्री शक्ती चे स्वागत केले व अलपोपहार देऊन महापालिका सदैव तत्परतेने तुमच्या सोबत असेल. असे आश्वासन दिले.तसेच चिंचवड येथेही भारतीय स्त्री शक्ती ने जागो जागी पत्रके चिटकवली व स्वच्छते विषयी जनजागृती केली. यात निवेदिता कच्छवा,अनघा शेवळे संपदा पटवर्धन ,उत्कर्षा कुलकर्णी सिमा शेलार पंडित सुरेखा अनिता चंद्रात्रे यांचा सक्रिय सहभाग होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.