Pune News : गांधी भवन येथे महात्मा गांधीजींना अभिवादन

एमपीसी न्यूज: महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन येथे महात्मा गांधींना स्मृतीदिनानिमित आज अभिवादन करण्यात आले. यावेळी मॉडर्न हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या चारशे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रार्थना आणि भजन सादर केले.

यावेळी संदीप बर्वे, नीलम पंडीत, धनंजय पवार, बाबालाल बीडीवाले, धनंजय पवार यांनी गांधीभवन सभागृहात भजने सादर केली. गांधी भवनाचे सचिव अन्वर राजन यांनी उपस्थितांना गांधी विचारांबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात संजय सोनटक्के, प्राचार्य सुजाता हागवणे, सचिन चव्हाण तसेच युक्रांद आणि गांधी भवनाचे कार्यकर्ते, नागरिक यांत सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.