Aundh : औंधला पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील  यांना अभिवादन  

एमपीसी  न्यूज – औंध येथील   रयत शिक्षण संस्थेचे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात  पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील   यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी  डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथील माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काळावर विजय मिळविला आहे. एकोणिसाव्या शतकात विविध समाजसुधारकांनी आपले आयुष्य समाजकार्यासाठी वाहिले होते. त्यामध्ये डॉ. राजाराम मोहन रॉय,  महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपले  आयुष्य समर्पित केले.

प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या की,  पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या या महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम., बीबीए., बी.होक.,  एम.ए., एम.कॉम. इतर कोर्स सुरूकरण्यात आले असून,  विद्यार्थ्यांना चांगला जॉब मिळावा म्हणून महाविद्यालयात विविध शॉर्ट टर्म कोर्स सुरू करण्यात आले आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे महाविद्यालयाची संपत्ती असून, अनेक विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना आय.आय.टी. सारख्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वसा आणि वारसा चालवण्याचे कार्य आमच्या महाविद्यालयातील सर्व रयत सेवक करीत आहेत.

कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे चेअरमन मा. दत्तात्रय गायकवाड आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमर्स विभागाचे प्रमुख डॉ. सुहास निंबाळकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ. संजय नगरकर आणि डॉ. सविता पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. नलिनी पाचर्णे,  डॉ. तानाजी हातेकर, प्रा. एकनाथ झावरे,  प्रा. भीमराव पाटील, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. किरण कुंभार,  डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.