Pimpri : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध पक्षाच्यावतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

थोर विचारवंत भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची १०२ वी जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात पुष्पांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन यांनी पंडितजींच्या ‘एकात्मता मानवतावाद’ या बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,स्थायी समिती अध्यक्षा.ममता गायकवाड,नगरसेविका अनुराधा गोरखे,प्रियांका बारसे,नगरसेवक बाबू नायर,नामदेव ढाके,विजय शिनकर,पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे,मंडलाध्यक्ष अजय पाताडे,किशोर ब्राम्हणकर,शिवदास हांडे,प्रदीप बेंद्रे,आशा काळे,गीता महेंद्रू,भीमा बोबडे,कुमार कोनकर,पाटीलबुवा चिंचवडे,आनंदा पाटील,नंदू कदम,मनोज पवार,कार्यालय सचिव रामकृष्ण राणे इ.मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.