Pimpri : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२४ व्या पुण्यतिथीनिमित्त वंचित बहूजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघ इच्छुक उमेदवार शहानवाज शेख, धनगर समाज यूवा नेते अजित चौगुले, समन्वयक सूरेश गायकवाड, वाहतूक आघाडीचे अतूल भोसले, सुभाष जाधव-अध्यक्ष वाकड थेरगाव विभाग युवा नेते विकास माने, सदाशिव पडळकर, लक्ष्मण रूपनवर, नागेश तित्तर, दत्तात्रय क्षत्रिकर, सुनील बनसोडे, उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्याय प्रविष्ट आदर्श राज्यकारभार करणा-या पहिल्या महिला राज्यकर्त्या होत्या, अशा कर्तृत्ववान महिलांची सध्या देशात गरज असल्याचे मत शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.