Pimpri News : राष्ट्रसंत गाडगेबाबा म्हणजे चालती-बोलती पाठशाळा – मानव कांबळे 

एमपीसी न्यूज – गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छतेची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती, असे प्रतिपादन मानव कोबळे यांनी केले.  

संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. गाडगेबाबा यांचे किर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील अनेक रुढी परंपरा यावर ते टीका करत असे  मानव कोबळे म्हणाले.

कैलास कदम यावेळी बोलताना असे म्हणाले की, महापुरुषांचे विचार हे मानवी मनाला प्रेरणा देत असतात. प्रत्येक महापुरुषांचे विचार आज स्वत:मध्ये उतरविण्याची गरज आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाजसेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. शिक्षण आणि स्वच्छतेचे महत्त्व गाडगेबाबांनी समाजाला पटवून दिले असे ते म्हणाले.

यावेळी आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, नगरसेवक मारुती भापकर, कॉम्रेड गणेश दराडे, संतोष गोठावले, ज्ञानेश्वर मुळे, छाया देसले, काशिनाथ नखाते, नीरज कडू, सतीश काळे, धनाजी येळकर पाटील, रफिक कुरेशी, नितिन बनसोडे, भाई विशाल जाधव, प्रताप गुरव, अशोक मिरगे, सतिष काळे, सिद्दीक शेख समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई विशाल जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे तर, आभार संतोष गोठावले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.