Vadgaon Maval : मावळ काँग्रेसच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज : मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने वडगाव मावळ येथील पूजा गार्डन कार्यालयात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.  लोहपुरुष वल्लभभाई पटेल जयंती व देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी  मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली. 

याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  चंद्रकांत सातकर, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष  बाळासाहेब ढोरे, ज्येष्ठ नेते उत्तमशेठ ओसवाल, संभाजी राक्षे, नाना धामणकर भगवान तारे, खंडोजी तिकोने, जितेंद्र खळदे, राजू  फलके, प्रताप हुंडेकरी, आनंता लायगुडे, धोंडीभाऊ घोजगे, प्रभाकर  टेमगिरे,  दिलीप गायकवाड,सुंदू बाफना, सिद्धेश दरेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.