Dehu : सी.ओ.डी देहूरोड कामगार संघटनेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो देहू रोड कामगार संघटना व कामगारांच्या वतीने सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो देहू रोड येथील मेनगेट वरील छत्रपति शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कमांडट ब्रिगेडियर सुजीत यादव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सेंट्रल ऑर्डीनन्स डेपो देहू रोड कामगार संघटना व कामगारांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंती निम्मित अभिवादन करण्यात आले. सी.ओ.डी देहू रोड येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब यांच्या पुतळ्याला कमांडट ब्रिगेडियर सुजीत यादव यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

छत्रपति शिवाजी महाराज यांच्या काळात युद्धात वापरण्यात आलेले गोरिला वॉर हे  युद्ध तंत्रज्ञान आजही भारतीय सेनेत वापरले जात असल्याचे उदाहरण सुजीत यादव यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमाला उपस्थित डेपोतील युनियनचे जनरल सेक्रेटरी चंदन आल्हाट, जनरल सेक्रेटरी संदीप गायकवाड, जनरल सेक्रेटरी शब्बीर इनामदार, जे सी एम बाळासाहेब चव्हाण, वर्क्स कमिटी सेक्रेटरी  हिरामण बालघरे, महेन्द्र कांबले, सोसायटी संचालक दादा गायकवाड, विकास बालघरे,  भरत कामठे,  सुनील विधाटे वर्क्स कमिटी सदस्य राहुल शिनलकर, रमेश लगड,  संजय बालघरे, प्रिया पंथगी, जे सी एम वैशाली मालवदे व संजय डुमडे यांनी आपले मनोगत व विचार व्यक्त केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.