Alandi News : महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असणाऱ्या ग्रिहिथाने पुन्हा एकदा रचला नवा विक्रम

एमपीसी न्यूज : सह्याद्रीच्या दाट जंगलात दि.29 जानेवारी रोजी ढाक किल्ल्याजवळ असलेला कळकराई हा अतिशय दुर्गम, अत्यंत कठीण स्वरुपाचा व 250 फुटांपेक्षा (Alandi News) अधिक उंचीच्या ह्या सुळक्या वर चढाई आणि रॅपलिंग मोहिम ही सचिन विचारे(वडील),ग्रिहिथा विचारे (वय वर्ष 8)व कल्याण येथील सुप्रसिद्ध सह्याद्री रॉक ऍडवेन्चअर्स टीम यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

नेहमी प्रमाणे ह्या वेळी सुद्धा ग्रिहिथा हीने हि मोहीम नऊवारी साडी नेसून पार पाडली.कळकराई सुळका सर करून ग्रिहिथाने सर्वात कमी वयात कळकराई सर करण्याचा नवीन विक्रम रचला आहे. कळकराई सुळक्याची उंची साधारण 250 फुट आहे. 90 अंशातील सरळ उभी कठीण चढाई करावी लागते.

कळकराई सुळका प्रस्तरारोहण हा कठीण आणि तांत्रिक श्रेणीत गणला जातो. हे शिखर चढण्यासाठी तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असते. कारण शिखरावर पोहोचण्यासाठी (Alandi News) 200-250 फूट तांत्रिक चढाई आणि उतरताना सुमारे 200-250 फूट रॅपलिंग समाविष्ट असते ज्यासाठी सर्व गिर्यारोहण उपकरणे आणि प्रमाणित अनुभव आवश्यक असतात.

Today’s Horoscope 02 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

कळकराई पायथ्याशी पोहचण्यासाठी जांमबीवली, कामशेत (धनगर वाडी) गावातून अडीच तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, यातून वाट काढावी लागते.

कळकराई सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि साहस याच्या जोरावर ग्रिहिथा (8 वर्षे) हीने तीचे वडील सचिन विचारे व कल्याण येथील सुप्रसिद्ध (Alandi News) सह्याद्री रॉक ऍडवेन्चअर्स टीमचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, रसिका येवले, लतिकेश कदम, स्वप्नील भोईर, सुनील कणसे, अभिषेक गोरे यांच्या सोबत ही मोहीम यशस्वी केली. याबाबत ची माहिती  सचिन विचारे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.