Pune : नेटमीटर वीजग्राहकांसाठी शनिवारी तक्रार निवारण दिन

एमपीसी न्यूज – रुफटॉप सोलर ऊर्जा प्रकल्पांच्या वीजग्राहकांसाठी नेटमीटरींग आणि बिलिंग संदर्भात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शनिवारी (दि. 4 ऑगस्ट) दुपारी 12 वाजता महावितरणकडून रास्तापेठ येथे विशेष ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागामधील रुफ टॉप सोलर प्रकल्पधारक वीजग्राहकांसाठी नेटमीटरींग आणि बिलिंग संदर्भात असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. यासाठी महावितरणच्या रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमधील कॉन्फरन्स हॉलमध्ये शनिवारी (दि. 4 ऑगस्ट) दुपारी 12 वाजता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधीत वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.