Pashan News : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे “समूह राष्ट्रगीत गायन”

एमपीसी न्यूज –  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणाऱ्या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत बुधवारी (दि.17) “समूह राष्ट्रगीत गायन” कार्यक्रम पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण या ठिकाणी सकाळी 11 वा डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

या कार्यक्रमास पुणे ग्रामीण पोलीस दलाकडील 20 अधिकारी, 80 पोलीस आमदार व 40 मंत्रालयीन स्टाफ हजर होते. या कार्यक्रमा वेळी पोलीस दलाकडील बँड पथकाने राष्ट्रगीत वाजवून देशभक्तीपर गीतांचे गायन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.