India Corona Update : वाढता वाढे ! गेल्या 24 तासांत 18,327 नवे रुग्ण, 108 मृत्यू  

एमपीसी न्यूज – देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत 18 हजार 327 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 108 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 11 लाख 92 हजार 088 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 08 लाख 54 हजार 128 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 14 हजार 234 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 1 लाख 80 हजार 304 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 22 कोटी 06 लाख 92 हजार 677 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 51 हजार 935 चाचण्या शुक्रवारी (दि.5) रोजी करण्यात आल्या आहेत.

 

गेल्या 24 तासांत देशात 108 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 656 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.07 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 94 लाख 97 हजार 704 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.