GST Collection: मे महिन्यात एक लाख 57 हजार कोटींची जीएसटी वसुली

सलग 14 महिने मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटी रुपयांहून अधिक, जीसीटी लागू झाल्यापासून 5 व्यांदा 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

एमपीसी न्यूज – मे 2023 या महिन्यात 1,57,090 कोटी रुपये एकूण वस्तू आणि सेवा कर (GST Collection) महसूल संकलित झाला असून त्यापैकी 28,411 कोटी रूपये सीजीएसटी; 35,828 कोटी रुपये एसजीएसटी तर 81,363 कोटी रुपये आयजीएसटी (वस्तूंच्या आयातीतून मिळालेल्या 41,772 कोटी रुपयांसह) तर ₹11,489 कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 1,057 कोटी रुपयांसह) म्हणून जमा झाले आहेत.

सरकारने 35,369 कोटी रुपये सीजीएसटी (GST Collection) म्हणून तर 29,769 कोटी रुपये आयजीएसटीमधून एसजीएसटी अशी तडजोड केली आहे. या नियमित तडजोडीनंतर मे 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल 63,780 कोटी रुपये सीजीएसटीच्या रुपात तर 65,597 कोटी रुपये एसजीएसटीच्या रुपात आहे.

मे 2023 या महिन्याचे वस्तू आणि सेवा कर महसुलात संकलन (GST Collection) मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसूल संकलनापेक्षा 12% ने जास्त आहे. या महिन्यात जमा झालेला वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल मागच्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 12% जास्त होता तर देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) गेल्या वर्षीच्या याच महिन्यात याच स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 11% जास्त आहे.

Maharashtra News : वारीसाठी टोल माफ; आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.