Guardian Minister: अखेर पालकमंत्री जाहीर; चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची (Guardian Minister) नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर, पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. अडीच महिन्यांनी जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले आहेत.

पालकमंत्र्यांची (Guardian Minister) यादी-

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.