Gudipadva Guideline : गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा ; सरकारच्या मार्गदर्शक सूचना

एमपीसी न्यूज – गुढीपाडवा सणानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेतच लोकांनी साधेपणाने आणि एकत्र न येता सण साजरा करावा, अशी सूचना सरकारने केली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त यंदा पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मिरवणुका काढू नयेत, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक जमा न होता सामाजिक अंतर व मास्क, सॅनिटायजरचा वापर करुन घरगुती गुढी उभारुन साधेपणाने सण साजरा करावा. सूचना सरकारने केली आहे.

गुढीपाडवा या सणाच्या दिवशी कोविड-19 प्रतिबंधक उपायांचा अवलंब करुन स्थानिक प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने आरोग्य उपक्रम/ रक्तदान शिबिरे/ स्वच्छताविषयक जागरुकता आदी उपक्रमांचे आयोजन करता येईल असे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.