Talegaon Dabhade : नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्र 6 येथे “लेक वाचवा, लेक शिकवा” अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – येथील नगरपरिषद माध्यमिक विद्यालय क्र.6 येथे विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचे विचार तसेच महिला शिक्षणासाठी केलेले काम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे त्या सोबत’ स्मरण आदर्शांचे, वाटचाल भविष्याची. या उक्ती प्रमाणे समाजातील विविध क्षेत्रांत काम करणा-या महिलांचा सन्मान त्याच बरोबर मुलींना आरोग्य मार्गदर्शन डॉ. लता पुणे (M.D.Ayurved) यांनी केले. तर कर्तृत्वान महिलांमध्ये प्राची हेंद्रे तळेगाव दभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला बालकल्याण समिती सभापती यांचा सन्मान करण्यात आला.

त्याच बरोबर शालेय स्तरावर चित्रकला, निबंध, वक्तृत्व, स्पर्धा घेण्यात आल्या व येणा-या सप्ताहात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन आहे, असे यावेळी सांगितले. या कार्यक्रम आयोजन शाळेचे मुख्याध्यापक अमोल पाटिल सर, वसुंधरा माळवदकर, प्रतिभा काळे, दीपमाला शिंदे , आणि आशा खुणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.