BNR-HDR-TOP-Mobile

Aundh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आरोग्य आणि आहारावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात “आरोग्य आणि आहार” या विषयावर आधारित कार्यक्रम पार पडला. 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सोनल सरोदे म्हणाल्या की, आपण बाहेरचे अन्न आणि जंक फूड खाल्ल्याने वेगवेगळे आजार होतात. आपल्या रोजच्या आहारात खजूर, ताक, दूध फळे इतर पदार्थांचा समावेश असायला हवा. चांगल्या आरोग्यासाठी रोज योगासने करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, निसर्गाने स्त्रियांना नवनिर्मितीची क्षमता दिली आहे. त्यामुळे स्त्रियांनी मानसिक, शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असायला हवे.  पुणे शहराला ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारसा लाभला असून आजच्या तरुणांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य वाचायला हवे. आजच्या तरुणांनी आपल्या ज्ञानाची क्षमता आणि बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी महापुरुषांचे चरित्र वाचायला पाहिजेत. डॉ.आ.ह. साळुंखे यांनी आपल्या साहित्यामधून स्त्रियांमधील क्षमतांची जाणीव करून दिली आहे.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणाले होते की,  भारत हा तरुणांचा देश असल्याने तो जगात महासत्ता होईल. फक्त आजच्या तरुणांना दिशा देण्याची गरज आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना दिशा देण्याचे कार्य रयत शिक्षण संस्था आणि महाविद्यालय करीत असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या वेळी पाहुण्यांची ओळख प्रा. आसावरी शेवाळे यांनी करून दिली. तर आभार प्रा. सायली गोसावी यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी प्रा.नलिनी पाचर्णे, प्रा.गौरी पवार, प्रा.स्नेहल रेडे, डॉ.अतुल चौरे विद्यार्थीनी वर्ग उपस्थित होता.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3