Pimple Saudagar : ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनच्या सभेत ज्येष्ठ नागरिकांना ऐच्छिक देहदानावर मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – डॉ डी.वाय.पाटील हॉस्पिटलचे डॉ. दिनेश पटेल व डॉ. मैत्रिया यांनी ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनच्या ज्येष्ठ नागरिकांना ‘ऐच्छिक देहदान’ याविषयी मार्गदर्शन केले.

ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन पिंपळे सौदागर यांची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा उन्नती सोशल फाऊंडेशन कार्यालय,जरवरी रोड येथे आज (दि.1) पार पडली. या वार्षिक सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शत्रुघ्न काटे, उन्नती सोशल फाउंडेशन चेअरमन संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे आदी उपस्थित होते. तसेच ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन अध्यक्ष शंकरराव पाटील, सेक्रेटरी रमेश वाणी, प्रदीप कुलकर्णी, बच्छराज शर्मा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सर्व सदस्यांना शुभेच्छा देत “ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन” च्या पुढच्या वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेत लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभागात एक विरंगुळा केंद्र तसेच सार्वजनिक शौचालय बनविण्यात येणार, असल्याचे आश्वासन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून ऑल सिनियर सिटीजन असोसिएशनतर्फे व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते केरळ रिलीफ फंडासाठी 5000 /- रु चा धनादेश देण्यात आला.

उन्नती सोशल फाउंडेशन चेअरमन संजय भिसे यांनी ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन सभासदांचे अभिनंदन करत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like