Wakad : वाकड पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाकडून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – किशोरवयात होणाऱ्या चुका (Wakad) आणि त्यांचे जीवनात होणारे दूरगामी परिणाम, याबाबत वाकड पोलीस ठाण्यातील दामिनी पथक आणि अधिकाऱ्यांनी वाकड येथील बाल सेवा इंग्लिश मिडीयम स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मोबाईल फोनचा वापर कमी करणे, विविध कायद्यांची माहिती आणि परिणाम तसेच आदर्श नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी धडपड करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, वाकड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक सुप्रिया पारसे, प्रियंका गायकवाड, पुनम बारवकर, पुष्पांजली यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या संस्थापिका ज्युतिका पहाण, मुख्याध्यापिका डॉ. अश्विनी पानसरे, समन्वयक अक्षदा जोशी, शिक्षक उज्वला झाकणे, किरण पोळ, निमिक्षा पोळ, अश्विनी भोसले, सुवर्णा थिगळे, श्वेता चौधरी, अनिता पहाण व पालक उपस्थित होते.

Defence Expo : महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बणवणारा डिफेन्स एक्स्पो

किशोरवयात मुले भरकटण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वयात त्यांना योग्य समज असणे आवश्यक असते. मुलांनी मोबाईलचा वापर कमी करायला हवा असे सांगत बाल लैंगिक अत्याचार कायदा, अमली पदार्थांचे सेवन, (Wakad) सायबर गुन्हेगारी, भांडण करणे अशा गोष्टींचे परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्रात हजेरी लावली.

प्रत्येक विद्यार्थी भारताचा जबाबदार नागरिक व्हावा, अशी अपेक्षा पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.