Pune News: ‘वेळेचे व्यवस्थापन व नेतृत्व गुण’ यावर महिलांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज : महिलांना घरातील जबाबदाऱ्या व करियर यांचा तोल कसा सांभाळावा यावार रिता शेटीया यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने वेळेचे नियोजन कसे करावे, त्याचे फायदे आणि नेतृत्व गुण वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याविषयी माहिती देण्यात आली.

सावित्रीबाई फुले जयंतीनिमत्त कात्रज येथील शारदा शिक्षण संस्था,(टीचर ट्रेनिंग कोर्स) यांच्यातर्फे ‘वेळेचे व्यवस्थापन व नेतृत्व गुण’ या विषयावर फेसबुक लाईव्ह व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास संस्थेच्या संस्थापिका शीतल  माळी, समन्वयक श्रुती मेहता उपस्थित होत्या.

संस्थेतर्फे महिलांचे शिक्षक प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. महिलांना घरातील जबाबदाऱ्या व करियर यांचा तोल सांभाळता यावा म्हणुन रिता शेटीया मॅडमनी ‘वेळेचे व्यवस्थापन व नेतृत्व गुण’ या विषयावर मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने वेळेचे नियोजन कसे करावे, त्याचे फायदे आणि नेतृत्व गुण वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याविषयी माहिती देण्यात आली.

आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे. आपला सहभाग कामात सतत ठेवणे. विचारपूर्वक निर्णय घेणे. या गोष्टीवर चर्चा झाली. यासाठी काही प्रात्यक्षिके पण दाखवण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.