Nigdi : मतदारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदार संघांतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निगडी येथे आज (गुरुवारी) मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी “स्वीप’ कक्षाअंतर्गत मतदानाविषयी नागरिकांचे प्रबोधन, मतदार जागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्हीव्हीपॅट व इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्याबाबत शपथ देण्यात आले. मतदान नोंदणी अधिकारी सुनील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश कोळप, तानाजी सावंत, सुशांत जोशी आदींनी नागरिकांना प्रशिक्षण दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.