Pune News : “होय मला बॉयफ्रेंड आहे” या विषयावर मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन

एमपीसी न्यूज : “आजकाल बॉय फ्रेंड असणे हे नैसर्गिक आहे. परंतु, या बॉयफ्रेंड वरचे आपले प्रेम हे डोळस असावे. प्रेम आणि आकर्षण यातील फरक काय? हे ओळखायला शिकले पाहीजे, असे मत पुणे येथील प्रसिद्ध लेखिका आणि समुपदेशक मुक्ता चैतन्य यांनी व्यक्त केले.

शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने “मोकळे व्हा” या उपक्रमांतर्गत आयोजित “होय मला बॉयफ्रेंड आहे” या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी व्यक्त केले.

Parenting Workshop In Pune : पुण्यात उद्या पालकांसाठी ‘सजग पालकत्व’ कार्यशाळा

पुढे त्या म्हणाल्या की, प्रेम आणि आकर्षण यांच्यातील फरक समजण्याच आपलं हे वय नाही. प्रेम ही भावना डोळसपणे समजून घ्यावी लागते. प्रेमाची खात्री पटल्यांवर त्या नात्यामध्ये पुढे जाण्यापूर्वी करियरवर फोकस करा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बना, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

याप्रसंगी आपल्या मनातील प्रश्न विद्यार्थिनींनी अतिशय मनमोकळ्या पद्धतीने विचारले आणि विद्यार्थीनींच्या प्रश्नांना मुक्ता चैतन्य यांनी उत्तरे दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार आणि सीइओ नीलेश नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकूमार महामुनी, उपप्राचार्य यशवंत डुंबरे, पर्यवेखक शरद ताटे यांच्यासह शिक्षकवृंद आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती जोशी यांनी केले तर आभार सुनीता कुलकर्णी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.