Gujarat Hospital Fire: अहमदाबाद येथील कोविड रुग्णालयाला भीषण आग, 8 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू

Gujarat: Fire breaks out at a covid hospital in Ahmedabad, Eight people died पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टि्वट करुन घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

एमपीसी न्यूज- गुजरातमधील अहमदाबाद येथील नवरंगपुरा येथे आज (दि.6) पहाटे एका कोविड समर्पित रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागली. या अग्नितांडवात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत सर्व रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. परंतु, याबाबत अद्याप रुग्णालयाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टि्वट करुन घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरंगपुरा येथील कोविड समर्पित श्रेय रुग्णालयात पहाटे सुमारे साडेतीनच्या सुमारास आग लागली. चौथ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये ही आग लागली. प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे.

सुरुवातीला आयसीयूमध्ये आग लागली आणि नंतर ती पसरत गेल्याचे सांगण्यात येते. अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात एकच पळापळ सुरु झाली. रुग्ण सैरावैरा पळू लागले. माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.


या अग्नितांडवात 8 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. 50 हून अधिक रुग्णांना अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. रुग्णालयातील 40 रुग्ण दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थलांतरित केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टि्वट करुन घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.