Lonavala : ग्रामीण परिसरात गुजरात पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रेमनगर कुसगाव याठिकाणी गुजरात पोलिसांनी कारवाई करत काही मुले व महिला यांना ताब्यात घेतले. गुजरात भागातील काही अल्पवयीन मुले पळवून आणून याठिकाणी दोन दिवसांपूर्वी ठेवण्यात आली असल्याची परिसरात चर्चा आहे. या कारवाईबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात चौकशी केली असता त्यांना कारवाईबाबत गुजरात पोलिसांनी काहीच माहिती दिली नसल्याचे सांगितले.

प्रेमनगर भागात दोन तिन दिवसांपूर्वी अकरा लहान मुलांसह महिला भाड्याने राहण्याकरिता आली होती. याठिकाणी गुजरात येथील क्रमांक असलेल्या सरकारी मोटारीमधून आलेल्या पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकत सदर अल्पवयीन मुले मुली व महिला यांना ताब्यात घेत गाडी निघून गेली. या कारवाईबाबतचे व्हिडिओ वायरल झाले असून कारवाई नेमकी कशाची झाली. ऐवढी अल्पवयीन मुले, मुली कोणी व कशाकरिता आणली होती. लहान मुले पळविणारे रॅकेट आपल्या भागात आले आहे का या भितीने नागरिक भयभित झाले आहेत.

गुजरात पोलिसांनी केलेल्या या कारवाई बाबत ग्रामीण पोलीस मात्र अनभिज्ञ आहेत. ग्रामीण पोलिसांना कसलीही कल्पना न देता ही कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.