Bhosari : गुजराती खरक समाजाचा आमदार महेश लांडगे यांना पाठींबा

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातील गुजराती खरक समाजाच्या लोकांनी महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी पाठींबा जाहीर केला. गुरुवारी (दि. १०) झालेल्या कार्यक्रमात समाजाच्या सर्व लोकांनी मिळून हा निर्णय घेतला.

यावेळी भुपत मांजीभाई पटेल, गणेश रामजी भाई पटेल, अशोक नरशी भाई कमालीया, अरविंद अर्जुन भाई सेंटा, गिरीधर रामजी भाई कपाडिया, नरान काबा भाई कपाडिया, गिरीधर घुसा भाई सेंटा, भारत राघव भाई भूत, कल्पेश भीमजी भाई कपाडिया, बिपीन भुपत भाई भालारीया, जितेंद्र काबा भाई धेधी, हरेश मढाभाई वालिया, जगदीश मांजी भाई पटेलीया, हृषीकेश भेगडे, संदेश साळुंके, राजन पटेल, हेमंत शिर्के, विक्रांत सरोदे, अमित परदेशी आदी उपस्थित होते.

गुजराती खरक समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन साधुराम कार्यालय येथे झाले. या कार्यक्रमासाठी महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार महेश लांडगे उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत गुजराती खरक समाजाच्या सर्व नागरिकांनी त्यांना पाठींबा जाहीर केला. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आश्वासन समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.

आमदार महेश लांडगे यांनी २०१४ पासून भोसरी विधानसभा मतदारसंघात केलेली कामे वाखाणण्याजोगी आहेत. कोट्यावधी रुपयांची कामे सध्या सुरु आहेत. विविध समाजांना एकत्रित करून प्रत्येक नागरिक सामोर ठेऊन सर्वसमावेशक विकासाला आमदार महेश लांडगे यांनी चालना दिल्याची भावना यावेळी गुजराती खरक समाज बांधवांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.