Pune News : गुजरात विजयानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष 

एमपीसी न्यूज : गुजरात निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विक्रमी विजयाबद्दल भाजपा पुणे शहर कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. (Pune News) गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सशक्त नेतृत्वावर जनतेचा विश्वास आणि प्रेमाचे प्रमाण आहे. भाजपाच्या सर्व समावेशक विकासाच्या धोरणावर जनतेनी दाखवलेला विश्वास हेच या यशाचे मुख्य कारण आहे असे शहराध्यक्ष मुळीक यांनी या वेळी सांगितले.

भाजपाचा हा विजयरथ आगामी काळात देखील असाच चालू राहील असा विश्वास मुळीक यांनी या वेळी व्यक्त केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Chakan News : चाकण मध्ये पालेभाज्या मातीमोल

यावेळी खासदार विनय सहस्रुबुद्धे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, बापू मानकर, प्रमोद कोंढरे, पुनीत जोशी, जितेन्द्र पोळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.