Gulabrao Patil On Rane: नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी- गुलाबराव पाटील

gulabrao patil slams on bjp leader narayan rane मुख्यमंत्री असताना कोकणात प्रकल्प उभे करू शकले नाही. त्यांच्याकडे बोलल्या शिवाय कोणीच लक्ष देत नाही अशी त्याची अवस्था आहे.' असे प्रत्युत्तर दिले.

एमपीसी न्यूज – नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (दि.9) राणेंच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत हे शिवसेनेचे घुमजाव आहेत.’ असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पावरून केला होता.

यावर गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात.

शेवटी त्यांना अशी विधाने करून स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते, मुख्यमंत्री असताना कोकणात प्रकल्प उभे करू शकले नाही. त्यांच्याकडे बोलल्या शिवाय कोणीच लक्ष देत नाही अशी त्याची अवस्था आहे.’ असे प्रत्युत्तर दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.