BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : सराईत गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज – गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. निगडी पोलिसांच्या तपास पथकाने सोमवारी (दि. 14) ओटास्किम येथे ही कारवाई केली.

रामप्रसाद संतोष सोलंकी (रा. चाकण गावठाण, खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील कर्मचारी हद्दीतील गुन्हेगार तपासात असताना पोलीस कर्मचारी प्रवीण मुळूक यांना आरोपीबाबत माहिती मिळाली की, सोळंकी हा पिस्तूल विक्रीसाठी ओटास्किम, निगडी येथे आला आहे. त्यानुसार त्यांनी परिसरात सापळा रचून सोळंकी याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पुढील चौकशीत तो पिस्तूल विक्रीसाठी निगडी येथे आल्याची कबुली त्याने दिली. सोळंकी कोणाला पिस्तूल विकणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.