Pune : वडगाव बुद्रुक येथे टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करीत गोळीबार

एमपीसी न्यूज – पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे आज मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा तरुणांनी दहशत माजविण्याचा दृष्टीने तीन वाहनांची तोडफोड करत गोळीबार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गॅरेजमध्ये बसलेल्या डोक्यावर हल्ला करण्यासाठी हे तरुण आले होते. या तरुणांनी येथील वाहनांच्या काचा फोडल्या आणि आत बसलेल्या तरुणांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये कुणालाही गोळी न लागल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.