Guru Pornima : नृत्याद्वारे गुरुवंदना करत साजरी केली गुरुपौर्णिमा; नंदकिशोर कल्चरल सोसायटीतील विद्यार्थ्यांचे सादरीकरण 

एमपीसी न्यूज – नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त (Guru Pornima) आपल्या नृत्याद्वारे गुरुवंदना केली. विद्यार्थ्यांनी यावेळी स्वतः नृत्य रचना साकारली होती. हा कार्यक्रम गुरुवारी (दि. 13) निगडी येथे पार पडला.

यावेळी नंदकिशोर कल्चरल सोसायटीचे डॉ.पं.नंदकिशोर कपोते यांनी गुरू पं.बिरजूमहाराज (Guru Pornima) यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले. त्यानंतर  संस्थेच्या  विद्यार्थ्यांनी गुरू डॉ. पं. नंदकिशोर यांचे पारंपारिक पद्धतीने पाद्यपूजन केले. या वेळी सर्व आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Vijay Shivtare : विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

 

 

विद्यार्थ्यांनी कथक नृत्यातील विविध प्रकार तत्कार, आमद, तोडे- तुकडे, परण, गतनिकास,कवित्त, लडी याशिवाय गुरूवंदना, दशावतार, अर्धांग इ. सादर केले. कार्यक्रमात 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाच्या अखेरीस स्वत: डॉ.पं.नंदकिशोर यांनी कथकनृत्य सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी नामदेवांचा  अभंग ‘कानडा राजा पंढरीचा’ यावर कथकनृत्य सादर केले. तसेच पं.बिरजूमहाराज यांनी शिकविलेल्या सुंदर बंदिशी (Guru Pornima) त्यांनी सादर केल्या.

संपूर्ण कार्यक्रमास साथ संगत  तबला- संतोष साळवे, यश त्रिशरन, पखावज – पवन झोडगे, हार्मोनियम व गायन – हरिभाऊ असतकर, अक्षय येंडे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन गारगी राणे, श्रद्धा रास्ते यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.