BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : गुरुपौर्णिमेनिमित्त शहरात एकशे बारा ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव 

एमपीसी  न्यूज – गुरुपौर्णिमेनिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था अन्य समविचारी संघटनांसह यंदा शहरात 112 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार आहे. 

या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि गुरुपूजन; ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटनाचे अद्वितीय कार्य’ आणि ‘परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांचे अलौकिक कार्य’ या विषयांवरील लघुपट (व्हिडिओ) समाजसेवी मान्यवरांचे राष्ट्र आणि धर्म रक्षणाविषयी मार्गदर्शन, तसेच ‘धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावरही मार्गदर्शन होणार आहे. तसेच या महोत्सवाद्वारे सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन, राष्ट्र अन् धर्म जागृतीपर फलकांचे प्रदर्शन आदींचाही लाभ घेता येणार आहे.

पिंपरी-चिंचवड येथे हा महोत्सव मंगळवार (दि. 16 जुलै) सायंकाळी सहा वाजता संतोष मंगल कार्यालय, संतोषनगर, 16 क्रमांक बस थांबा, थेरगाव  श्रीगणेश मंगल केंद्र, एच्.डी.एफ्.सी बँकेचा रस्ता, कवडेनगर, नवी सांगवी, अपूर्वा गार्डन मंगल कार्यालय, तपोधाम कॉलनी, वराळे रस्ता, तळेगाव स्टेशन, तळेगाव गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभाग घेऊन गुरुतत्त्वाचा लाभ करून घेण्यासाठी सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.