Pimpri : ओम तबला वर्गाच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रम

एमपीसी न्यूज – ओम तबला वर्गाच्या वतीने गुरुवंदना हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास रसिकांची उत्कृष्ट दाद मिळाली.

प्राधिकरण येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार हभप किसन महाराज चौधरी, भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, ज्येष्ठ पत्रकार विश्वास मोरे, तबला वादक मुकुंद इनामदार तसेच कलप प्रतिष्ठान माऊंटलिटरा झिस्कूनचे अध्यक्ष राहूल कलाटे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ऋतुजा, पुजा, स्वरदा या विद्यार्थीनींनी गणेश स्तवनाने केली. यावेळी सायली सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. ओम तबला वर्गातील विद्यार्थ्यांनी तबला वादन सादर केले. यामध्ये दक्ष बुरानी, पार्थ शेंगुले, अमित शिंदे, क्षितीज परमेश्वर, निर्भय पवार, सुमीत उंबरे, अर्नव कोठावदे, अर्णव कारके, निनाद पेंडसे, आर्य घुघरी, वेंदात गुऴवणी, राज माने, रुद्रप्रताब शिंदे, तनिश खराडे, वेद थिटे, वरद देवा-हे, विराज काकडे, आर्थव जोशी, चिराग रासणे, सार्थक बाबर, शौनक पाटील, प्रणव अमराळे, ऋषिकेश स्वामी, आश्विक रत्नाकर, अभंग काशीद, चिन्मय कुलकर्णी, हार्दिक सोनवणे या विद्यार्थीनी तबला वादन सादर केले. यावेळी संगीत शिक्षिका प्रिती जाधव यांनी शास्त्रीय गायन सादर केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रमुख कलाकार आंतरराष्ट्रीय किर्तीचे हार्मोनियम वादक संतोष घंटे यांचे सोलो वादन झाले. त्यांनी राग वाचस्पतीने ओमची सुरुवात केली.  रसिकांशी संवादीनीने संवाद साधत अतिशय वेगळ्या पद्धतीने सादरीकरण केले.  श्रोत्यांना हार्मोनियम विषय दैनंदिन उदाहरणे देऊन मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्याची साथ अमोल राऊत यांनी केले.

या कार्यक्रमासाठी ईनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडला या महिला सामाजिक संघटनेने गरजू विद्यार्थ्याला पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन तबला मिळविण्यासाठी सहकार्य केले. यावेळी या क्लबच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी दलाल आणि सचिव रेखा जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन विनायक गुळवणी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.