BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : गुरुबानी कीर्तनकार दादा मोहनदास जहांगियानी यांचे निधन

एमपीसी न्यूज – गुरुबानी कीर्तनकार आणि कथाकार दादा मोहनदास जहांगियानी यांचे निधन झाले. ते संत बाबा मुलसिंग दरबारचे सदस्य होते. त्यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.

दादा मोहनदास संत बाबा मुलसिंग दरबारचे सदस्य, तसेच अमृतवेला पिंपरी या संस्थेचे कोअर मेम्बर होते. गरिबांना मदत करण्यात त्यांनी आपल्या आयुष्याचा सर्वाधिक काळ व्यतीत केला. गरिबांच्या लग्नासाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. त्यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दादा मोहनदास यांना मानणारा सिंधी समाज त्यांच्या जाण्याने शोकाकुल झाला आहे. पिंपरी कॅम्प परिसरातील बहुतांश व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेऊन एक दिवसाचा शोक पाळला. पिंपरी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजता पगडी हा विधी काळेवाडी येथील बालाजी लॉन्स येथे होणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3