Pune News: ‘गुरुदक्षिणा’ चित्रप्रदर्शन बुधवारपासून; जलरंगातून साकारलेल्या आकर्षक कलाकृती पाहण्याची संधी

एमपीसी न्यूज : जलरंगातून साकारलेला निसर्ग, व्यक्तिचित्रे, जुन्या पुण्यासह ग्रामीण आणि शहरी भागाचे सौंदर्य दर्शविणाऱ्या कलाकृतींच्या ‘गुरुदक्षिणा’ या चित्रप्रदर्शनाला येत्या बुधवारपासून सुरुवात होत आहे.

यातील बहुतांश चित्रकार हौशी आहेत तर काही व्यावसायिक. प्रत्येक चित्रकाराचे व्यवसाय-उद्योग भिन्न-भिन्न; कुणी इंजिनिअर, कुणी आर्किटेक्ट, कुणी नृत्यांगना तर कुणी आकाशी झेप घेऊन वायूवेगाशी स्पर्धा करणारे वैमानिकही, पण या सर्वांचे नाते जोडले गेले आहे ते रंगछटांशी. अशा हरहुन्नरी चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

Nigdi News: निगडी येथील अमृता विद्यालय येथे जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात

गुरुदशिक्षणा हे प्रदर्शन दि. 7 ते दि. 11 डिसेंबर 2022 या कालावधीत दर्पण आर्ट गॅलरी, पत्रकार नगर येथे आयोजित करण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 7 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात 24 चित्रकारांच्या कलाकृती मांडण्यात येणार असून सर्व कलाकार मिलिंद मुळीक यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. मिलिंद मुळीक आणि जलरंग हे एक अतुट समिकरण आहे. कागदावर जलरंगात अत्यंत वेगाने चित्र रेखाटणे हे त्यांचे कौशल्य आहे. तंत्रकौशल्य आणि सर्जनशिलता यांचा अनोखा संगम त्यांच्या चित्रांमधून दिसून येतो.

या चित्रप्रदर्शनी अंतर्गत दि. 10 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता मिलिंद मुळीक जलरंगातून प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.