मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Gurukul : ‘गुरुकुल’ दशकपूर्ती सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : गुरुजी श्री पद्मनाभन् कृष्णदासा ह्यांच्या (Gurukul) अनुयायांनी स्थापन केलेल्या गीता आश्रमपुणे‘ ह्या आध्यात्मिक कार्यास समर्पित संस्थेद्वारा संचालित पिंपरी येथील गुरुकुल‘ ह्या वास्तूचा दशकपूर्ती समारंभ बुधवारदिनांक ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्व सभासदांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला.

Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे यांना लाज वाटली नाही का, एकनाथ शिंदे यांचा पलटवार

 २०१२ मधील विजयादशमी पासून कार्यान्वित गुरुकुल‘ येथे विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातेप्रवचनेसत्संगभजन ह्याबरोबरच गुरुकुल संस्कृत (Gurukul) अकॅडमी‘ ह्या संस्थेचे संस्कृत अध्यापन कार्यही गुरुकुल येथे होते.

 

गुरुजींच्या विशेष उपस्थितीत संपन्न झालेल्या ह्या सोहळ्यात सभासदांनी विजयादशमी तसेच जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुकुल‘ वास्तूच्या इतिहासास उजाळा देण्यात आला. ‘गुरुकुल संस्कृत अकॅडमी‘ संस्थेच्या यंदाच्या आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस उत्सवातील कार्यक्रमांच्या पारितोषिक विजेत्यांना संस्थेचे ज्येष्ठ अध्यापक श्री अजित मेनन ह्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

एका विशेष कार्यक्रमात सभासदांनी आपल्या भाषणांतून प्राचीन संस्कृत साहित्यातील विविध सुभाषितांचे आंतरिक आध्यात्मिक लक्ष्यार्थ उलगडून दाखवलेही सुभाषिते आजच्या काळातही कशी प्रासंगिक व मार्गदर्शक आहेत ह्याचा उपस्थितांना अनुभव आलाह्यानंतर भजन पार पडलेभारतातील विविध भाषेतील रसाळ भक्तीगीते व भजने ह्यात सादर करण्यात आलीसमारंभाची सांगता लघुभोजनाने झाली.

Latest news
Related news