Sanskrit Day : गुरुकुल संस्कृत अकॅडमीने साजरा केला आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस

एमपीसी न्यूज – संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी कार्य करणाऱ्या पुणे व पिंपरी येथील गुरुकुल संस्कृत अकॅडमीतर्फे गुरुवारी (दि.11) आंतरराष्ट्रीय संस्कृत दिवस (Sanskrit Day)  साजरा केला. संस्थेच्या परंपरेनुसार यंदाही संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अनेक कल्पक व आशयघन संस्कृत कार्यक्रम स्वतःरचून सादर केले. 

कार्यक्रमांत विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या लघुनाटिका, भाषणे, श्लोक, स्तोत्र व गीत गायन इत्यादींचा समावेश यामध्ये होता.यामध्ये 13 वर्षीय मुलीने शिवताण्डवस्तोत्र गायन ते साठीच्या घरातील ज्येष्ठांचे रंजक लघुकथाकथन असा संस्कृत कार्यक्रमांचा (Sanskrit Day) विस्तृतपट होता.

विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेची सुगमता आणि सौन्दर्य यांचा आस्वाद घेतला.केरळ राज्यातील विख्यात कलाविशेष “कथाप्रसंगम्” चा संस्कृत भाषेतील आविष्कार हा एक आगळा प्रयोग या प्रसंगी विद्यार्थ्यांनी रचला होता. संगीत, अभिनय आणि वक्तृत्व यांच्या मिलापातून प्रेक्षकांचे मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनही केले.

संस्थेचे प्रणेते आचार्य पद्मनाभन् कृष्णदासा व अध्यापक अजित मेनन यांच्या परिश्रमातून आकारास आलेल्या गुरुकुल संस्कृत अकॅडमी संस्थेमध्ये देशातील विविध प्रांतातील,विविध वयोगटातील,निरनिराळ्या पेशातील व क्षेत्रातील विद्यार्थी संस्कृत शिकत आहेत.संस्थेचे सर्व अभ्यासक्रम विनामूल्य चालवले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.