Lonavala : पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या स्पर्धेत गुरुकुल विद्यालय प्रथम

आँक्झिलियमच्या मुलींचा दुसरा क्रमांक

एमपीसी न्यूज – पर्यावरण पूरक गणेश बाप्पांच्या मूर्ती बनविण्याच्या स्पर्धेत तुंगार्ली येथील गुरुकुल विद्यालयाच्या मुलींनी प्रथम क्रमांक मिळविला तर आँक्झिलियम काँन्व्हेंटच्या मुलींचा दुसरा क्रमांक आला. द फर्न अँन इकोटेल या पर्यावरणवादी हाॅटेलच्या वतीने शाळकरी मुलांकरिता पर्यावरण पूरक मूर्ती बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गुरुकुल, व्हिपीएस, आँक्झिलियम व आंतरभारती बालग्राम या चार शाळांचे 20 गट सहभागी झाले होते.

यामध्ये गुरकुल विद्यालयाला अनुक्रमे प्रथम व तृतीय क्रमांक मिळाला तर आँक्झिलियम काँन्व्हेंट हायस्कूला द्वितीय व दुसर्‍या गटाला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यासह सर्व सहभागी गटांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. प्रत्येक गटाला गणेश मूर्ती बनविण्याकरिता दोन तासांचा अवधी देण्यात आला होता तसेच मूर्ती बनविण्याकरिता शाडू माती पुरविण्यात आली होती. लोणावळ्यात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा गणेश उत्सवानिमित्त पार पडली. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासोबत त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश रुजविण्याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे हाॅटेलचे मालक आशिष अगरवाल यांनी सांगितले.

यावेळी गुरुकुल सरव्यवस्थापक रमेशकुमार गुप्ता, हरीओम चचडा, विद्यालयाचे मुख्यध्यापक बापुलाल तारे, कला शिक्षक रमेश बोंद्रे, व्हिपीएसचे कला शिक्षक चंद्रकांत जोशी, आँक्झिलियम शाळेच्या अस्मा निंबर्गी व युनिटा पत्राव हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.