Pimpri : शहरात जोरदार गारपीटसह सोसाट्याचा वारा

एमपीसी न्यूज : पिंपरी (Pimpri) –  चिंचवड शहरात विजांच्या कडकडाटात संध्याकाळी बुधवारी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. सकाळ पासून पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. साडेचारच्या सुमारास ढग दाटून आले आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील उपनगरांमध्ये बर्फवृष्टीचा अनुभव शहरवासीयांनी घेतला.

PCMC : महापालिकेतील तब्बल 102 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त

निगडी, पिंपरी, देहू, चिंचवड, भोसरी  आदि भागात सोसाट्याचा वारा होता. देहू भागातही बर्फाचे थर अक्षरक्ष: पाहावयास मिळाले. अशा पावसाचा अनुभव नागरिकाना मे महिन्याच्या शेवटी पाहावयास मिळाल्याने नागरिकामध्ये पावसाची चर्चा रंगली आहे. अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या अवकाळी पावसाचा फटका मावळ भागातील शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे, शेतमालाचे आणि पिकाचे मोठे नुकसान झालं असल्याची भिती व्यक्त होत आहे. तसेच, विक्रेते व फेरिवाल्यांचे मोठे नुकसान तीन दिवसांपासून होत असल्याने रोजगाराची चिंता सतावू लागली आहे. नोकरदार वर्गालाही पावसाचा सामना करत घरी परतावे लागत आहे. त्यात वाहतूक कोंडी होत असल्याने चाकरमान्यांची धांदल उडत आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहन चालकांची कसरत होत आहे.

पाऊस पडल्यानंतर काही कालावधीनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकाना आल्हाददायक वाटत आहे. सोमवारी गारपीट झाल्यावर पुनः बुधवारी पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहर आणि परिसरातील काही भागात गारपीट झाल्याने नागरिकाना घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. कालपासून मावळ परिसरामध्ये गहू, हरभरा, बटाटा या पिकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तर, दुसरीकडे वातावरणातील या बदलामुळे आजार वाढण्याची शक्यता देखील पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या डॉक्टरांनी वर्तवली आहे.

सर्व छायाचित्रे प्रवीण श्रीसुंदर

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.